


ठाणे:– मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटकाळात मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुढे सरसावला असून, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील स्थानिक शिवसैनिकांसह अहोरात्र मदतकार्यात सक्रिय झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर, पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत औषध पुरवठा करण्यात येणार आहे.
यासाठी औषधांनी भरलेला एक मोठा टेम्पो पुणे येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाला आहे. यावेळी पक्षाचे उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. सचिनजी अहिर, पुणे जिल्हा प्रमुख श्री. उल्हासजी शेवाळे, राज्य संघटक श्री. वसंतजी मोरे, शहर प्रमुख संजयजी मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर मोडक, सुजित थेवरे, नितीन गावडे, प्रतिष्ठानचे श्री अभिषेक जाधव, रोहन आंब्रे, संजय पाठक तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा टेम्पो रवाना झाला. याविषयी बोलताना केदार दिघे म्हणाले, “पुराच्या पाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांपर्यंत आरोग्यविषयक मदत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या संस्कार आणि शिकवणीनुसार आम्ही हे मदतकार्य करत आहोत.”
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे स्थानिक पातळीवर नागरिकांना धीर देत असून, मदतकार्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे असे केदार दिघे म्हणाले.
या कार्यक्रमात ५०,०००/- पर्यंत औषधे वाटप आणि श्रवण यंत्रासाठी ५०,०००/- रुपयांची मदत करण्यांत आली. श्रीमती लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड,श्रीमती सविता कृष्णा शेटकर,सौ.दिपाली अनिल मोरे,श्री श्रीनाथ शंकर गुप्ता,श्री दिनेश रतीवाडकर या सर्व रूग्णांच्या नातेवाईकांनी तसेच सौरवी सुरेश पंडा या ४ वर्षीय श्नवण यंत्र बसविण्यात येणाऱ्या मुलीच्या आई वडिलांनी देखील शिवसेना, शिव आरोग्य सेना आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व श्री केदार दिघे साहेबांचे मनःपुर्वक आभार मानले….!
त्याप्रसंगी ठा.म.पा.चे माजी आरोग्य सभापती श्री.दत्ताराम(अप्पा) मोरे, जेष्ठ शिवसैनिक श्री.विठ्ठल भुईंबर,शिवसेना ठाणे शहरप्रमुख श्री प्रदिप शिंदे, श्री.चंद्रकांत विधाटे,शिवसेना उपशहरप्रमुख श्री.वसंत गवाळे, शिवसेना संपर्कप्रमुख व धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे सदस्य श्री संजय ब्रीद, श्री संजय पाठक, श्री. मिलिंद दळवी, श्री राजन पोटे, शिवसेना विभागप्रमुख श्री.महेश(मया) पाटिल,श्री जिवाजी कदम, श्रीमती देशपांडे मॅडम,उपविभागप्रमुख श्री.दत्ता सावंत,श्री रविंद्र मोरे,श्री हरिश्चंद्र काळे,श्री.सुरेश सावंत,शाखाप्रमुख श्री तानाजी कदम, श्री ज्ञानेश्वर बागवे,श्री भास्कर शिर्के,श्री संजय भोसले,आरोग्य सैनिक डाॅ.रेखा भुईंबर, त्याचप्रमाणे शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ प्रशांत विट्ठल भुईंबर, ठाणे जिल्हा समन्वयक श्री एकनाथ अहिरे, ठाणे जिल्हा सह संघटक श्री राजेंद्र शिंदे, ठाणे शहर सह समन्वयक श्री देवशी राठोड,श्री अजय राणे,सौ.अक्षता पांचाळ, सौ.नाझ पाशा,श्री उल्हास शिवणेकर,श्री अझीम शेख, श्री.अजित माने, श्री लितेश केरकर, कु.सानिया अन्सारी,श्री अनिल ढोपे,श्री संजय बर्वे व सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या!
“आदिशक्ती तू , प्रभूची भक्ती तू , झाशीची राणी तू ,
मावळ्यांची भवानी तू , प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू ,
आजच्या युगाची प्रगती तू “…
धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान तर्फे, ज्येष्ठ शिवसैनिक अनिता बिर्जे, रेखा खोपकर यांच्या प्रमुख उपस्तिथीत, महिला दिनानिमित्त महिला सफाई कामगारांचा साड्या देऊन सन्मान करण्यात आला.
ठाणे शहर अध्यक्ष श्री. रोहन आंब्रे ह्यांच्या पुढाकाराने तसेच प्रतिष्ठानचे सचिव श्री. मिलिंद दळवी, कार्याध्यक्ष श्री. संजय पाठक, श्री. हरीश अलमारे, श्री. यश शेंदुर्णीकर व इत्तर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यांने जागतिक महिला दीनाचा कार्यक्रम, ब्राह्मण विद्यालय, चरई येथे यशश्वी रित्या पार पडला.
सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
आपला,
केदार दिघे

कोरोना आजाराच्या बिकट काळात ते आज तयागात “समुदाय आरोग्य अधिकारी” आपला जीव मुठीत धरून सर्व आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. अहोरात्र सेवा देताना त्यांच्या सेवेचा हक्काचा कामावरील आधारित मोबदला व गेले पाच महिन्याचे थकीत असलेलं मासिक मानधन हे प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने अवघ्या आठवड्या भरात १७२ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशासना कढून देण्यात आले.
प्रतिष्ठानचे पालघर संपर्क प्रमुख श्री.आतेज राऊत व माझे सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच लोकसेवेच व्रत यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी आजतयागत मला साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि ह्या सत्कर्यासाठी सदैव पाठबळ देणाऱ्या आमच्या सर्वसामान्य देणगी दारांचे तसेच कोणतेही राजकीय पाठबळ नसताना प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सर्व प्रसिध्दी माध्यमांचे मनःपूर्वक आभार…
◆ कारोनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून प्रत्येक गोष्ट ठाणेकरांना पर्यंत पोहोचवण्याचं काम ठाण्यातील पत्रकार आहेत.
◆ त्यांना एक मदतीचा हात या भावनेतून धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापाक, अध्यक्ष केदार दिघे यांच्या माध्यमातून मोफत धान्य वाटप करण्यात आले.
◆ याप्रसंगी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे,जनमुद्राचे संपादक दीपक दळवी,ठाणे वॉच चे संपादक गणेश कुरकुंडे,धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी संजय पाठक, संकेत जोशी, संग्राम सैद, रोहम आंबरे, प्रशांत जगदाळे इत्यादी उपस्थित होते.










– आजही ग्रामीण भागातील मुलांना बऱ्याच मुलभूत गोष्टींची गरज आहे, यापैकीच एक महत्वाची गरज म्हणजे पायात घालायची चप्पल. सुविधांच्या अभावामध्ये खेडेगावांमध्ये रस्ते फारच खराब असात. अशावेळी रस्त्यावरून चालताना लहान मुलांची अवस्थ फारच दयनीय असते. हाच विचार करून धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान च्या वतीने प्रत्येक मुलाच्या पायात चप्पल असावी असा संकल्प सोडला आहे. आता पर्यंत अनेक मुलांना या प्रकल्प अंतर्गत चप्पल तसेच इतर आवश्यक गोष्टी देण्यात आल्या आहेत.
.– तळागाळातील लोकांना आजही जगणे असह्य झाले आहे. वर्षभर वारा-पाऊस सहन करत आपल्या झोपडीत रात्रभर जागरण हे जणू नित्याचेच असते. एकवेळचे जेवण मिळण्यासाठी दिवसभर कष्ट करणाऱ्या गरिबांना मुलभूत गोष्टी नेहमीच मिळाल्या नाही आहेत. याच विचारातून गरिबांना मोफत ब्लँकेट वाटप करण्याचा प्रतिष्ठानचा उपक्रम सुरु झाला. आता पर्यंत शेकडो लोकांना या प्रकल्पाअंतर्गत ब्लँकेट देण्यात आली आहेत.
– गरिबांच्या उद्धारासाठी जन्म झालेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश हा गरिबांची प्रगती हा आहे. खडतर परिश्रम घेऊन मुलांचे शिक्षण पूर्ण करणारी लोक आजही बघायला मिळतात. हौस-मौज सोडून, पोटाला चिमटा काढून, प्रसंगी एकवेळ उपाशी राहून व एक-एक पैसा जमवून मुलांचे शिक्षण पूर्ण करणारे आई-बाप आधुनिक जगात त्यांच्या मुलांसाठी आवश्यक गोष्टी पूर्ण करू शकत नाहीत. बऱ्याच संकटांना समोर जाऊन आजही गरिबांना आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही आहेत. त्यामुळे गरीब पालकांच्या मुलांचा शिक्षण हा मुख्य पायाच जर भक्कम करण्यासाठी मदत केल्यास त्यांची देखील स्वप्न पूर्ण होतील यात शंका नाही.
या स्मारकामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.