मनोगत

कर्मवीर ते धर्मवीर

नेत्याइतकाच वा त्यापेक्षा कार्यकर्ता लोकप्रिय असू शकतो हे देशातील एकमेव उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शिवसेना संघटनेची समर्थ धुरा वाहताना भगव्याची त्यागी वृत्ती अंगी बाणलेले मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच स्व. आनंद दिघे. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ ठरवत अनाथांचा नाथ, कर्मवीर ते धर्मवीर अशा नानाविध उपाध्यांचा धनी ठरलेला हा माणूस म्हणजे चालती-बोलती अखायीकाच होती.
– एकनाथ शिंदे

 

तपस्व्याची तपपूर्ती

निरलस सेवाभावी वृत्तीने सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी एकरूप होऊन, आपल्या समाजसेवेचा व लोकप्रियतेचा ठसा ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रात उमटविला असे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब!
– विलास मोरे (विभाग प्रमुख / माजी नगरसेवक)

सर्व सामन्यांचे दीपस्तंभ

धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबांचे व्यक्तिमत्व हे हिमालयासारखे उत्तुंग होते. निरलस समाज सेवेचे, सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचे, निस्मीम त्यागाचे आणि सर्वाभूत आपुलकी जपणारे दीपस्तंभ म्हणजे आनंद दिघे साहेब.
– नरेश मस्के (उप जिल्हाप्रमुख / सभागृह नेते, ठाणे)

अद्वितीय नेता

राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रात येणाऱ्या संकटांना आव्हान बनून ठामपणे सामोरे जाणारे व ते आव्हान समर्थपणे पेमुल यशस्वी होणारे अद्वितीय नेतृत्व म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब.
– गोपाळ लांडगे (जिल्हाप्रमुख, शिवसेना कल्याण)

आदर्श नेता

संकटे अंगावर घेऊन त्यांचे पानिपत करणारे, आक्रमकता हा स्वभाव गुणधर्म परंतु सर्वधर्म समाजातील उच्चभू पासून तळागाळातील पीडितांचे अश्रू पुसणाऱ्या त्यांच्यासाठी सदैव धावणाऱ्या ममतेचे नाव म्हणजेच आदरणीय आनंद दिघे साहेब.
– प्रताप सरनाईक (आमदार, ओवळा-माजिवडा विधानसभा)

जनसामान्यांचे कैवारी

जनसामान्यांना आपलासे वाटणारे, गोर गरिबांचे कैवारी, दु:खीतांचे अश्रू पुसणारे आणि अहोरात्र समाजसेवेसाठी झटणारे असे होते धर्मवीर आनंद दिघे साहेब. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सहवास हा आमच्यासाठी परिसस्पर्श होता. शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हि भूमिका आम्ही दिघे साहेबांकडून शिकलो.
– राजन विचारे (आमदार, ठाणे शहर)

साहेब

सत्य, सदाचार अन चारित्र्याच्या अधिष्ठानावर ज्यांचे जीवन पुष्पित अन् गंधीत झाले. देहाच्या उंचीपेक्षा विचारांची उत्तुंगता, कर्तुत्वाची श्रेष्ठता, आचारांची शुद्धता ही ज्यांच्या जीवन राजश्री वस्त्राला लागलेली जरतारी झालर ते म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब.
– रमेश वैती (ठाणे शहरप्रमुख)

सर्वसामान्यांचा आधार

धर्मवीर आनंद दिघे साहेब हे सर्वसामान्य जनांचे तारणहार होते. विरोधी पक्षातील मंडळींशी सुद्धा त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तरुणांचे ते मार्गदर्शक होते. गोर-गरीब सर्वसामान्यांसाठी त्यांनी अहोरात्र काम केले आहे.ठाण्यातील घराघरात त्यांचे फोटो पूजले जातात. यावरून त्यांची महती लक्षात येते. एक थोर समाजसेवक म्हणून त्यांनी ठाणे घडविले.
– एच. एस. पाटील (महापौर, ठाणे)

वन मॅन आर्मी

कोणालाही न दुखावता आपले ईस्पित सध्य करून घेण्याचे तसेच विरोधकांनाही आपल्या चालीने चालावयास लावण्याचे अफलातून कौशल्य दिघे साहेबांनी प्राप्त केले होते. म्हणूनच काहीजण तर त्यांना साक्षात ईश्वरी अवतात, अद्भुत शक्तीचा साक्षात्कारी पुरुष म्हणूनच संबोधत. संघटन कौशल्याचा चमत्कार दिघे साहेबांच्या ठायी त्यांच्या प्रत्येक कृतीमधून दिसत असे. समोर आलेला माणूस हा माझाच माणूस आहे, हा ठाम आत्मविश्वास दिघे साहेबांविषयी श्रद्धाभाव वाढीस लागत असे. असा नेता झाला नाही व होते नाही.
– रामदास सरोदे

दिघे साहेबांचा सहवास

ठाणेकर तसेच शिवसैनिक आणि इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही स्व. दिघे साहेबांची आठवण काढताना दिसतात. ठाणे आणि स्व. दिघे साहेब एक समीकरणच झालेले होते. आजही स्व. दिघे साहेबांचे नाव लोकांच्या घराघरात, मनामनात भरून राहिलेले आहे आणि ते सदैव एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे राहील.
– नरेश मणेरा

जनसामान्यांचे नेतृत्व-धर्मवीर आनंद दिघे साहेब

समाजसुधारक, समाजसेवक आणि राजकीय नेता हे जनसागरातील मुख्य नद्या आहेत. त्यांच्या लाटांचे तांडवनृत्य आणि जनसागरातील उलथापालथ या संगमातूनच त्रिवेणी संगम तयार होतो. हा संगम मला दिघे साहेबांच्या ठायी दिसला.  अथांग सागरात ठामपणे उभ्या असलेल्या हिमनगाच्या स्थिरतेवर ढवळणाऱ्या सागराच्या उंच लाटांचा व वादळवाऱ्यांचा कोनाताकॅह परिणाम होते नाही. अगदी त्याचप्रमाणे दिघे साहेब जनकल्याणाच्या कार्याची धुरा स्वतःच्या शिरावर धारण करून अढळपणे सांभाळली.
– अप्पा मोरे (माजी सभापती, परिवहन सेवा)

संघटन व्यवस्थापन चमत्कार आनंद दिघे

राजकारण करीत असताना सामान्य कार्यकर्ता आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी एकाचवेळी जुळवून घेण्याची कसरत साहेबांनी अनेकवेळा अतिशय कुशलतेने केले. दिघे साहेबांनी राजकारणाबरोबरच अनेक क्षेत्रात आपली अपरिहार्यता निर्माण केली आणि ती त्याची सर्वात मोठी ताकद होती.
– दिलीप सपाटे

आठवणीतले साहेब

स्वर्गीय ‘आनंद दिघे’ साहेब हा एक अद्भुत पंचाक्षरी मंत्र व एक महान दैवी शक्ती होती. स्व. दिघे साहेब हि एक असामान्य व्यक्ती व असामान्य शक्ती होती.
– अशोक गावकर (पत्रकार, ठाणे)

वीर योद्धा

जबर कठोरता…. नुसत्या नजरेने समोरच्या व्यक्तीचा ठाव घेणारे दिघे साहेब…. आम्हां सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे दिघे साहेब.
– उद्धवराव जगताप

माझ्या जीवनातील ‘आनंद क्षण’

साहेबांचे अनेक प्रसंग व आठवणी कायमच्या हृदयात कोरल्या गेल्या आहेत. त्यांच्या जाण्याने फार मोठा आघात झाला आहे. जीवा-भावाचा मार्गदर्शक गेल्याचे जाणवले. साहेबांचे लोभस व्यक्तिमत्व होते.
– विलास मोरे

परमेश्वर रुपी दिघे साहेब भेटले

परमेश्वर कोणी पाहिलेला नाही मात्र दिघे साहेबांच्या रूपाने परमेश्वर आम्ही पाहिला असे आम्ही सांगतो.
– के. बी ढवळ, सेवा निवृत्त रजिस्टर (ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे)

सर्वांचे श्रद्धास्थान

दैवीशक्ती मिळालेला हा अवलिया प्रत्येक पद्यातून, घराघरात पोहोचला होता. सर्वांच्या सुख-दु:खात सामील होत असे. कोणतीही अडचण असली तरी आनंदाश्रमात गेले कि आपले काम होणारच अशी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना होती.
– मनोहर हरीश्चंद्र आंबवणे

आयुष्यातला अमृत ठेवा

श्री दिघे साहेबांची काम करण्याची जिद्द वाखाणण्यासारखी होती. त्यांच्या आजारपणातही त्यांनी उत्सव जोरात साजरे केले आहेत. साहेबांनी कुठेही कमतरता जाणवू दिली नाही.
– डॉ. अनिल तांबे (तांबे हार्ट एँड मेडिकल हॉस्पिटल, ठाणे प.)

तेजोमय दर्शन

अनेक वेळेस मला साहेबांचे तेजोमय दर्शन घडले. त्यांनी मिळविलेले ईश्वरी तत्व हे सर्वांना द्यावेसे वाटणे, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.
– सपाटे बुवा

वह तो चले गये ऐ दिल

वह हर एककी मुसिबत में काम आते थे | खासकर गरीबों की मदद करते थे | वह अल्लाताला की तरफ से एक नेक बंदा थे | मुसलमानों के लिये तो एक मसीहा थे | हर एक के दु:ख-दर्द में काम आनेवाले थे |
– सिराज अहमद शेख (चाचा) (उपविभाग प्रमुख, सिराज चाळ, आझाद नगर, ठाणे)

मला भावलेले आनंद दिघे साहेब

मुस्लीम अथवा हिंदू कोणताही धर्म असो, समाजातील गरीब-दुबळ्या स्त्रियांना साहेब आपल्या घरातील वाटायचे. त्यांच्याकडे काम होणारच असा त्यांना आत्मविश्वास असायचा. सध्याच्या मतलबी जगात साहेबांसारखी प्रेमळ, ध्येय असणारी, आपले सर्व आयुष्य जनतेला दिलेला, देवमाणूस आता असायला हवा होता.
– मोहिनीराज देविदास भावे (निवृत्त, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई/ठाणे)

आनंद दिघे – एक मुलुखावेगळे नेतृत्व

समाजातील सर्व थरातील मोजकी मनसे एकत्र करून त्यांच्या मार्फत जन माणसाचा कानोसा घेत त्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान व्हायचं विलक्षण कौशल्य आनंद दिघे साहेबांना यांना प्राप्त झाले होते. न बोलता संवाद साधणारा एक अजब नेता. खंडीभर शब्दांची उधळण करण्यापेक्षा मोजक्या शब्दात जनहितार्थ आज्ञा देणारा नेता हीच त्यांची खरी प्रतिमा आहे. सर्वांना हवाहवासा वाटणारा, विरोधी पक्षांनाही आपल्याकडे असे नेतृत्व नाही म्हणून खंत वाटावा असा हा नेता होता.
– वि. ह. भूमकर

दूर दृष्टी के व्यक्ती थे स्व. धर्मवीर आनंद दिघे

बडी बारिकी से दिघे साहब आम कार्यकर्ता का ध्यान राखते थे |
– घनश्याम तिवारी