चालू उपक्रम

६९ व्या राज्यस्तरीय" कबड्डी स्पर्धाचे आयोजन

श्री. मावळी मंडळ ठाणे यांच्या वतीने ९७ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त “६९ व्या राज्यस्तरीय” कबड्डी स्पर्धाचे आयोजन अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले.
सदर कबड्डी स्पर्धेत उपस्तिथ राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

आदिवासी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच दंतस्वच्छता संचाचे वाटप

आदिवासी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच दंतस्वच्छता संचाचे वाटप, श्री केदार दिघे यांच्या प्रमुख उपस्तिथीत करण्यात आले.
याप्रसंगी या मोहिमेस शुभेच्छा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
असे सामाजिक उपक्रम अखंड सुरू राहावेत तसेच यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करायला तयार असू अशी भावना व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास ‘एबीसीडी फाउंडेशन’चे सदस्य आणि अभिनव विद्यामंदिरच्या मुख्याध्यापक, अध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यांग मुलांसाठी विशेष दहीहंडीचे आयोजन

धर्मवीरांची आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने आयोजित ‘महादहीहंडी २०२२’ दिव्यांग मुलांसाठी विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार श्री. राजनजी विचारे साहेबांच्या पुढाकाराने दिव्यांग मुलांच्या जीवनात जिद्द निर्माण करता यावी याकरिता हा आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कृष्ट प्रयत्नाला मनःपूर्वक शुभेच्छा..

मनोरमा नगर शाळा क्र. १२८ येथे विद्यार्थांना दप्तर वाटप

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त, धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आणि शिवसेना ठाणे शहर
यांच्या संयुक्त विद्यमाने, मनोरमा नगर शाळा क्र. १२८ येथे विद्यार्थांना दप्तर वाटप करण्यात आले..

जागतिक क्षमा दिनाच्या (पर्युषण दिनाच्या) शुभेच्छा

टेंभी नाका येथील जैन मंदिरात दर्शन घेऊन समस्त जैन बांधवांना जागतिक क्षमा दिनाच्या (पर्युषण दिनाच्या) दिल्या शुभेच्छा.

लालबागच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले.
सोबत श्री. सुधीर साळवी साहेब

“तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा”

द ग्रँड गुजरात फेस्टिवल

गुजराथी पदार्थांची आवड असलेल्या ठाण्यातील खवय्यांना एक जबरदस्त मेजवानी देण्यासाठी ठाणे सी के पी हॉल येथे “द ग्रँड गुजरात फेस्टिवल” चे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात गुजरात स्थायीत ११ वर्षाच्या ऐश्वर्याने एक अप्रतिम असे मराठी गाणे सादर केल्या बद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित राहून आयोजक सौ. भावना समीर गुप्ते व त्यांच्या सर्व सहकार्यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

४थी राष्ट्रीय (फुटबॉल व अथेलेटिक्स) फेडेरेशन कप-२०२२ चा शुभारंभ

नाशिक येथे निलेश राणे युवा प्रतिष्ठान व स्कुल स्पोर्ट्स अँड प्रोमोशन फेडेरेशन ऑफ इंडिया आयोजित ४थी राष्ट्रीय (फुटबॉल व अथेलेटिक्स) फेडेरेशन कप-२०२२ चा शुभारंभ श्री केदार दिघे यांच्या हस्ते करण्यात आला, या स्पर्धेत देशातील १४ राज्यातील ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

भिवंडी शहर शिवजयंती उत्सव समिती २०२२

यावेळचा शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्याचा मान श्री केदार दिघे यांना देण्यात आला.

जागतिक महिला दिन उपक्रम

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या!
“आदिशक्ती तू , प्रभूची भक्ती तू , झाशीची राणी तू ,
मावळ्यांची भवानी तू , प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू ,
आजच्या युगाची प्रगती तू “…

धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान तर्फे, ज्येष्ठ शिवसैनिक अनिता बिर्जे, रेखा खोपकर यांच्या प्रमुख उपस्तिथीत, महिला दिनानिमित्त महिला सफाई कामगारांचा साड्या देऊन सन्मान करण्यात आला.

ठाणे शहर अध्यक्ष श्री. रोहन आंब्रे ह्यांच्या पुढाकाराने तसेच प्रतिष्ठानचे सचिव श्री. मिलिंद दळवी, कार्याध्यक्ष श्री. संजय पाठक, श्री. हरीश अलमारे, श्री. यश शेंदुर्णीकर व इत्तर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यांने जागतिक महिला दीनाचा कार्यक्रम, ब्राह्मण विद्यालय, चरई येथे यशश्वी रित्या पार पडला.

सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
आपला,
केदार दिघे

पालघर जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मिळाले पाच महिन्यांचे थकीत मानधन

कोरोना आजाराच्या बिकट काळात ते आज तयागात “समुदाय आरोग्य अधिकारी” आपला जीव मुठीत धरून सर्व आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. अहोरात्र सेवा देताना त्यांच्या सेवेचा हक्काचा कामावरील आधारित मोबदला व गेले पाच महिन्याचे थकीत असलेलं मासिक मानधन हे प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने अवघ्या आठवड्या भरात १७२ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशासना कढून देण्यात आले.

प्रतिष्ठानचे पालघर संपर्क प्रमुख श्री.आतेज राऊत व माझे सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

कोरोना योद्धा - समाजिक संस्था

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच लोकसेवेच व्रत यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी आजतयागत मला साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि ह्या सत्कर्यासाठी सदैव पाठबळ देणाऱ्या आमच्या सर्वसामान्य देणगी दारांचे तसेच कोणतेही राजकीय पाठबळ नसताना प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सर्व प्रसिध्दी माध्यमांचे मनःपूर्वक आभार…

ठाण्यातील पत्रकारांना मोफत धान्यवाटप.

◆ कारोनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून प्रत्येक गोष्ट ठाणेकरांना पर्यंत पोहोचवण्याचं काम ठाण्यातील पत्रकार आहेत.
◆ त्यांना एक मदतीचा हात या भावनेतून धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापाक, अध्यक्ष केदार दिघे यांच्या माध्यमातून मोफत धान्य वाटप करण्यात आले.
◆ याप्रसंगी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे,जनमुद्राचे संपादक दीपक दळवी,ठाणे वॉच चे संपादक गणेश कुरकुंडे,धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी संजय पाठक, संकेत जोशी, संग्राम सैद, रोहम आंबरे, प्रशांत जगदाळे इत्यादी उपस्थित होते.

!! श्री स्वामी समर्थ !!
"कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट यांच्या वतीने" अनेक संतांच्या उपस्थितीत आणि
"भागवताचार्य श्री ह.भ.प एकनाथ महाराज सदगीर" यांच्या शुभ हस्ते
वंदनीय "गुरुवर्य श्री. मोडक महाराज" यांना सन्मानित करण्यात आले.

कोकणातील पूरग्रस्तांसाठी "कर्तव्यनिधी"

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त वृध्दाश्रम आणि आश्रम शाळेत ब्लँकेट व फळ वाटप

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त, आपल्या प्रतिष्ठानचे पालघर संपर्कप्रमुख श्री. आतेज राऊत, श्री. आरिफजी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने, हालोळी येथील वृध्दाश्रम आणि बेटेगाव येथील आश्रम शाळेत ब्लँकेट व फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
मोबाईल – +91 98206 05710

ऑनलाईन देणगी देण्यासाठी इथे क्लिक करा.

धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान
अध्यक्ष- केदार दिघे

५०० कुटुंबाना धान्यवाटप व इतर उपयोगी साहीत्यवाटप

साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच मुसळधार पाऊसच्या तडाख्याने नुकसान झालेल्या #पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीलगत ग्रामीण भागात, ५०० कुटुंबाना धान्यवाटप व इतर उपयोगी साहीत्यवाटप #धर्मवीर #आनंद #दिघे #युवा #प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले…
#पालघर जिल्ह्यातील आगवण, सरावली व दांडी याठिकाणी हा कर्यक्रम संपन्न झाला.
पश्चिम किनार पट्टीवर आजही धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे, अशांनाच आज सहकार्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हे ओळखून, आगवण (जिल्हा परिषद शाळा आगवण) ह्या गावापासून धान्यवाटप करण्यात आले..यावेळी बरोबर शिवसेना उपतालुका प्रमुख अनिलजी तरे, अरुणजी पाटील, सरपंच भौतेश पाटील, माजी सरपंच मिनेश पाटील, सौरभ भोईर, परेश म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच सरावली मुळगाव (जिल्हा परिषद शाळा सरावली) येथे धान्यवाटपाच्या कर्यक्रमाला, सौ. शीतल वावरे माजी उपसरपंच, सीमा ताई राऊत, प्रजित घरत माजी उपसरपंच, धीरेश घरत शाखाप्रमुख, प्रफुल घरत, मीना ताई वावरे, राकेश पाटील युवासेना जिल्हाप्रमुख, आरिफ सिद्दीकी, दीपक पाबळे, गोवर्धन वावरे हे मान्यवर उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाची सांगता दांडी गाव (जिल्हा परिषद शाळा दांडी विभाग) येथे झाली. शिवसेना नेते माजी तालुका प्रमुख सुधीर भाई तामोरे, कु.विघ्नेश दवणे व दिघे साहेबांच्या सानिध्यातील अनेक सहकारी उपस्थित होते…
प्रतिष्ठानचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आतेज राऊत व प्रतिष्ठानचे सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार…
मोबाईल – +91 98206 05710

ऑनलाईन देणगी देण्यासाठी इथे क्लिक करा.

धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान
अध्यक्ष- केदार दिघे

Fight Covid 19 - धर्मवीरांचे कार्य | धर्मवीरांचे आशीर्वाद

आज आपल्या धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान , पनवेल विभागाकाढून हॅन्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पनवेल मधील सफाई कर्मचारी, अनेक चेक पोस्ट व सिग्नल वर गस्त ठेवणारे पोलीस व वाहतूक पोलीस कर्मचारी आणि महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना हे वाटप करण्यात आले.
ह्या लॉकडाउनच्या गेल्या दोन महिन्यात विक्रमगड, पालघर, भिवंडी व पनवेल येथील प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे अथक परिश्रम घेतले व आपल्या कार्यात, आपल्या लोकांप्रतीच्या सेवेत जे सात्यत्य ठेवले त्या बद्दल माझ्या ह्या सर्व सहकाऱ्यांचे खूप कौतुक व मनःपूर्वक आभार…
मोबाईल – +91 98206 05710

ऑनलाईन देणगी देण्यासाठी इथे क्लिक करा.

धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान
अध्यक्ष- केदार दिघे

'कोरोनाच्या' परिस्थितीत अन्नदानाचे समाजकार्य

गेल्या ४ महिन्यांपासून कोरोना आजाराने संपूर्ण जगभर मृत्यूचे थैमान घातले आहे. त्याचा पहिल्या दिवसापासून परिणाम झाला तो दररोज व्यवसाय करून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या गरीब मजुरांवर व इतर गरजूंवर.
शहरामध्ये सरकारने जेवणाची सोय करून दिली असली तरी खेडेगावातील लोक अजून उपेक्षितच आहेत. अशा प्रसंगात फार मोजक्याच संस्था समाजसेवेचे काम अविरतपणे करत आहेत आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान हि त्यातीलच एक संस्था. संचारबंदी लागू केल्याच्या पहिल्या दिवसापासून पनवेल परसारतील भुकेलेल्यांना मोफत अन्नदानाचे काम धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान या संस्थेने आपल्या हाती घेतले आहे. आज पर्यंत शेकडो लोकांच्या दोन वेळच्या पोटाचा प्रश्न सोडविलेल्या या संस्थेपुढे दिवसागणिक अडचणी वाढत आहेत व अन्नदानाची मागणी हि वाढत आहे. यामध्ये आवश्यकता आहे ती समाजकार्यात अधिकाधिक मदतीचे हात पुढे येण्याची.
संस्थेने हाती घेतलेल्या या महान कार्यात आपण प्रत्यक्ष हातभार लावून अन्नदानासाठी लागणारी सामग्री अथवा आर्थिक साहाय्य करून आपण मदत करू शकता. कुणीही उपाशी राहू नये या संकल्पामध्ये आम्ही पुढे केलेला हात आपण नक्कीच धराल याची आम्हाला खात्री आहे. त्यासाठी आम्हाला संपर्क करा.
टीप – आपण केलेल्या आर्थिक मदतीसाठी आवश्यक असलेले 80G प्रमाणपत्र संस्थेतर्फे आपणास देण्यात येईल.
मोबाईल – +91 98206 05710

ऑनलाईन देणगी देण्यासाठी इथे क्लिक करा.

धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान
अध्यक्ष- केदार दिघे

.

ग्रामीण भागात मुलांना चप्पल वाटप

– आजही ग्रामीण भागातील मुलांना बऱ्याच मुलभूत गोष्टींची गरज आहे, यापैकीच एक महत्वाची गरज म्हणजे पायात घालायची चप्पल. सुविधांच्या अभावामध्ये खेडेगावांमध्ये रस्ते फारच खराब असात. अशावेळी रस्त्यावरून चालताना लहान मुलांची अवस्थ फारच दयनीय असते. हाच विचार करून धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान च्या वतीने प्रत्येक मुलाच्या पायात चप्पल असावी असा संकल्प सोडला आहे. आता पर्यंत अनेक मुलांना या प्रकल्प अंतर्गत चप्पल तसेच इतर आवश्यक गोष्टी देण्यात आल्या आहेत.

.

गरीब लोकांना ब्लँकेट वाटप

– तळागाळातील लोकांना आजही जगणे असह्य झाले आहे. वर्षभर वारा-पाऊस सहन करत आपल्या झोपडीत रात्रभर जागरण हे जणू नित्याचेच असते. एकवेळचे जेवण मिळण्यासाठी दिवसभर कष्ट करणाऱ्या गरिबांना मुलभूत गोष्टी नेहमीच मिळाल्या नाही आहेत. याच विचारातून गरिबांना मोफत ब्लँकेट वाटप करण्याचा प्रतिष्ठानचा उपक्रम सुरु झाला. आता पर्यंत शेकडो लोकांना या प्रकल्पाअंतर्गत ब्लँकेट देण्यात आली आहेत.

धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मारक

धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मारक

– गरिबांच्या उद्धारासाठी जन्म झालेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश हा गरिबांची प्रगती हा आहे. खडतर परिश्रम घेऊन मुलांचे शिक्षण पूर्ण करणारी लोक आजही बघायला मिळतात. हौस-मौज सोडून, पोटाला चिमटा काढून, प्रसंगी एकवेळ उपाशी राहून व एक-एक पैसा जमवून मुलांचे शिक्षण पूर्ण करणारे आई-बाप आधुनिक जगात त्यांच्या मुलांसाठी आवश्यक गोष्टी पूर्ण करू शकत नाहीत. बऱ्याच संकटांना समोर जाऊन आजही गरिबांना आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही आहेत. त्यामुळे गरीब पालकांच्या मुलांचा शिक्षण हा मुख्य पायाच जर भक्कम करण्यासाठी मदत केल्यास त्यांची देखील स्वप्न पूर्ण होतील यात शंका नाही.

या स्मारकामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.

  • उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी शाळा आणि कॉलेज
  • सर्व सुविधांनी सज्ज हॉस्पिटल
  • अनेक विषयांवरील भव्य वाचनालय
  • विविध क्षेत्रात करियर करण्यासाठी कोर्सेच चे शिक्षण आणि मार्गदर्शन
  • विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी व्यासपीठ
  • कमी किमतीत चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाचे धान्य