काका आनंद दिघे साहेब यांच्या सोबत केदार

व्यक्तिमत्व - केदार दिघे यांचे...

समाजसेवेचा वसा

आयुष्यात दररोज आपणास काहीनाकाही शिकायला मिळते यावर केदार यांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे ते वेळोवेळी नेतृत्व, व्यवस्थापन, संभाषण, माहिती तंत्रज्ञान, कार्यसंघ, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, संशोधन आणि संस्थात्मक कौशल्ये या गोष्टी अधिकाधिक आत्मसाद करण्यावर भर देतात.

नेतृत्व, संभाषण कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन

कोटक महिंद्रा, सीमेंस आणि टाटा एआयजी सारख्या नामांकित कंपन्यांच्या विविध प्रकल्पांवर यशस्वीरित्या काम करताना केदार यांनी प्रकल्प प्रमुख नात्याने आपल्या नेतृत्व आणि संभाषणाचा दर्जा उंचावण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे.

वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन साखळी, विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये व्यावसायिक सुस्पष्टता आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल आत्मविश्वास वाढविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी केदार यांनी पार पडली आहे आणि यातूनच . सुमारे २२ देशांमधील आंतरराष्ट्रीय डायरेक्टर आणि व्यावायिक नेटवर्कशी यांच्याशी वाटाघाटी आणि व्यापार संवाद करण्याची त्यांना उत्तम माहिती आहे.

मोठ्या प्रमाणातील व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन

सहकाऱ्यांसोबत काम करणे व त्याच बरोबर काही वेळेस दडपणाखाली काम करण्याची त्यांची क्षमताही विविध प्रकल्प आणि संकट व्यवस्थापनात भाग घेतल्यामुळे विकसित झाली.

संघटनेचे कार्य करताना अगदी कार्याच्या तळापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीसोबत काम करण्याची त्यांची आवड, उत्सुकता आणि अनुभव यामुळेच युवा संघटना निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येते.

आयटी क्षेत्र आणि संशोधन कार्य

विद्यापीठात शिकताना व त्याच सोबत व्यावसायिक काम करताना आय.टी. आणि संशोधन कौशल्य विकसित होत गेले. केदार यांच्या मते विकासामध्ये तंत्रज्ञान हा महत्त्वपूर्ण घटक आहे. आयटी क्षेत्रातील योगदान, संशोधनात्मक  लेखन ही आवश्यक कौशल्य त्यांच्याकडे होती ज्याने त्यांची संशोधन क्षमता विकसित केली.

इतर कौशल्ये

केदारच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक कारकीर्दीमुळे त्यांची संस्थात्मक कौशल्ये वाढली आहेत. या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयातील कोणतेही कार्य वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी उपयोग केला आहे.

व्यस्त मतदार संघ कार्यालयात त्यांची संघटना कौशल्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, खासकरुन एखाद्याच्या अडचणीत त्याला त्वरित व कार्यक्षम प्रतिसाद देणे.

ही सर्व कौशल्ये केदारला स्वतःची ताकद असल्यासारखी वाटतात. त्यांचा असा विश्वास आहे एक चांगली व्यक्ती म्हणून प्रगती करण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्यासाठी मदत करणारी अशी कौशल्याची ताकद म्हणजे एक मालमत्ता आहे. कारण त्यांचा दृढ विश्वास आहे की एखाद्या समाजाचा विकास वैयक्तिक विकासापासून सुरू होतो.

लक्ष आयुष्याचे 

दिघे साहेबांचे काम हृदयात जतन करून, त्यांच्या दूरदृष्टीची व्यापक आणि अथक परिश्रमांची मशाल, जी त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून प्रज्वलित केली होती, त्याच नेतृत्वासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी आज विश्वासाने केदार दिघे यांच्याकडे पाहिले जाते आहे.