व्यक्तिमत्व - केदार दिघे यांचे...

- इथे क्लिक करा.

श्री. केदार दिघे

अध्यक्ष - धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान

लोकांच्या समस्या, त्यांचे निराकरण. दिन दुबळ्यांना अडचणींच्या वेळी दिलेला मदतीचा हात. गोर गरिबांना मदत अशा एकूणच सभोवताली चालणाऱ्या अहोरात्र सामाजिक कार्याच्या सागरामध्ये १९८० साली केदार दिघे यांचा एका विनयशील अशा सामान्य मध्यम वर्गाच्या कुटुंबात जन्म झाला. काका स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे बालपणातच केदार यांना सामाजिक कार्य आणि त्यासंबंधित उपक्रमांची त्यांना जाणीव झाली.

सामाजिक व व्यावसायिक जाणीवेच्या अद्वितीय मिश्रणातून धोरणात्मक व्यवस्थापन, संघ बांधणी व कोणतेही ज्ञान सहज आत्मसाद करण्याचे बहुगुणी कौशल्य यातून केदार दिघे यांच्या जीवनाचे पैलू दिसून येतात. केदार दिघे यांच्या याचा गुणांवरून त्यांना सामाजिक जागृती आणि उन्नती यांची उत्कृष्ट समज आहे हे सिद्ध होते.

कै. श्री. धर्मवीर आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्यातील सामाजिक कार्याचे प्रतीक आहेत आणि केदारसाठी तेच मार्गदर्शक, तत्वज्ञ आणि गुरु होते.

लहान असताना केदार नेहमीच आपल्या काकांकडे पहात असत आणि या समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या समर्पणाने प्रेरित झाला होता. केदार यांनी बाराव्या वर्षापासूनच त्यांच्याकडून समाजसेवेच्या बारकावे जाणून घेतल्या. आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आपले केदार यांनी आयुष्य झोकून दिले आहे आणि जीवनाच्या प्रवासात जर ते समाजात बदल घडवून आणू शकले तर त्यांचे भाग्य असेल असे त्यांना वाटते.

व्यावसायिक कारकीर्दीसह केदार नेहमीच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. ठाणे व आसपासच्या जिल्ह्यातील गरीब व वंचितांच्या समाजातील उत्कर्षासाठी त्यांचे काय चालू आहे. कोणतेही सामाजिक कार्य हे अनेकांचे हातभार लागून यशस्वी होते याचीच केदार यांना पूर्ण जाणीव आहे आणि त्यातूनच विविध विभागांमधील मतभेद पुसण्याच्या उद्देशाने त्यांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेला एकत्र येण्याचे अनेक मार्ग तयार केले आहेत.

केदार दिघे लोकांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत, त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे काम केले आहे. स्वर्गीय श्री. आनंद दिघे यांच्या प्रेरणेने २००६ साली या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला. साहेबांच्या स्मरणार्थ या समाजसेवी संस्थेस ‘धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान’ असे नाव देण्यात आले.