मान्यवरांची श्रद्धांजली

शिवसेनेने एक झुंझार व अन्याय, अत्याचारवर झेप घेणारा वाघ गमावला

आनंद कितीही कर्तबगार व कामात नेक असला तरी बोलणे तसे कमीच असे. व्यासपीठावर मिरवण्याची व सभा गाजविब्याची हौस त्याला नव्हती. तो वक्ता नव्हता पण कार्याचा भोक्ता होता. बेभान व भन्नाट वागणे, जेवणखान व झोपेची परवा न करता लोकांची कामे करणे हेच त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. कोणतेही पद नसलेला आमचा आनंद ठाण्याचा अनिभिषिक्त सम्राट म्हणून वावरला.

आनंद दिघे गेला यावर विश्वास ठेवणे कठीणच होतंय. आनंदने प्रकृतीची हेळसांड केली. तेच त्याला बांधलं, सिगारेट, चहा व गर्दीचा गराडा तब्बेतीच्या बाबतीत जरा जबादारीन वागला असता तर आनंदचा अंत इतक्या लवकर झाला नसता.

– मा. श्री. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे

आनंद दिघे हि व्यक्ती नव्हती. कुणावरही संकट आलं कि भावाच्या नात्यानं धावून जाणारी एक व्यक्ती होती. हा प्रसंग बघण्याचं दुर्भाग्य लाभेल अस मला कधीच वाटलं नाही. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख जाहले आहे. दुःखाचे वारणन करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

– मा. श्री. उद्धव ठाकरे

आनंद दिघे हे आमदार नव्हते, खासदार नव्हते तरी ते जनतेचे अभिषिक्त प्रतिनिधी होते जनमानसावर त्यांचा जबरदस्त पगडा होता. कट्टर हिंदुत्व व ध्येयवादी असा हा नेता होता.

– मा. श्री. मनोहर जोशी

आनंद दिघे प्रखर हिंदुत्वादी आणि अत्यंत लोकप्रिय संघटक होते. त्यांच्या अपघाती निधनाने राज्यातील एका वादळी पर्वाचा अत्यंत करून असा शेवट झाला आहे

– मा. श्री. नितीन गडकरी

सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविणारे समाजाभिमुख आणि अत्यंत निर्भीड नेते म्हणून आनंद दिघे परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा शिवसेना नेता हरपला आहे.

– मा. श्री. विलासराव देशमुख

अगदी तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याना मदतीचा हात देणारा थोर समाजसेवक शिवसेनेचा ज्वलंत ध्येयावादी शिवसैनिक, अनेकांना उच्च स्थानावर पोहोचवणारा किमयागार हरपला आहे. त्यांच्या अकाली निधनाने तीव्र दुःख झाले आहे.

– मा. श्री. रामदास कदम

आनंद दिघे यांचा शिवसेना प्रमुखांवर व हिंधू धर्मावर प्रचंड विश्वास होता. गाढ श्रद्धा होती. हिंदू धर्माचा पूर्जन्मावर विश्वास आहे. म्हणूनच म्हणतो दिघे यांनी पुनर्जन्म घ्यावा तो ही ठाण्यातच !

– मा. श्री. राज ठाकरे

आनंद दिघे यांच्या आकस्मित निधनामुळे मला तीव्र धक्का बसला असून मी एक मित्राला मूकलो आहे. कार्यसम्राट या एकाच शब्दात आनंददिघें यांच्या व्यक्तीमहत्वाचे वर्णन करता येईल. त्यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील गोर गरीब, उपेक्षित दलित यांचा दाता हरपला आहे.

– मा. श्री. गोपीनाथ मुंडे

सामान्य लोकांपर्यंत संवाद साधून शिवसेनेच्या कामाला दीघे यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सामाजिक प्रश्नापासून ते कौटुंबिक प्रश्ना हाताळण्यात त्यांना सामाधान वाटे. नंदीनी नरबळी प्रकरणात आवाज उठवण्यासाठी ते अनेक स्री अत्याचार विरोधी आंदोलनात महिलांनाच सहभाग वाढून महापौर पदापासून ते सर्वत्र प्रोत्साहन देण्यात त्यांचा निर्मळ सहभाग होता.

– मा. नीलम गोऱ्हे

ठाणे जिल्ह्यातील कैवारी व शिवसेनेचे आधारस्तंभ असेल आनंद दीघे यांचे आकस्मित निधन हि धक्कादायक घटना आहे. निग्रही वृत्तीने काम केल्याने ते जनतेच्या गळयातील ताईत बनले होते. व्यासपीठावर भाषण न करता हि लोकप्रिय झालेले ते दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व होते.

– मा. श्री. राम नाईक

दिघे यांच्या निधनाने मला प्रचंड धक्का बसला. महाराष्ट्रातील सामाजिक विकासाच्या चळवळीचे या घटनेने मोठे नुकसान जाहले आहे. दिघे यांच्या गरिबी, सामाजिक हक्क यासाठीच लढा लोकांना सतत प्रेरणा देईल.

– मा. श्री. प्रमोद महाजन

मी सर्वात अपयशी व दुर्दैवी आहे . मारणं कुणाला चुकत नाही. आनंद मला मुलासारखा होता. आणि मुलाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ बापावर यावी यासारखे दुर्भाग्य नाही.

‘सज्जन मारुती, दुर्जन मारुती मरण चुकले कोणाला. वीज चमकते, विजून जाते, दिपून जाते सर्वांना,’ दीघे यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ते शिवसेनेचे भूषण होते. आनंदचे उपकार कोणीही कधीही विसरणार नाही.

– मा. श्री. दत्ताजी साळवी

माझ्या जीवनात आनंद दिघे यांना परममित्र म्हणून वेगळे स्थान होते. दिघे गेले यावर अजूनही विश्वास बसत नाही. मनोगत व्यक्त करण्याच्या पलीकडे मी कधी गेलो नाही. ‘स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी, आई विना भिकारी’, असे म्हणतात पण या दोघांची माया देऊन दिघे यांनी श्रीमंत केले.

– मा. श्री. वसंत डावखरे

गेली ३२ वर्ष आम्ही संघटनेचे काम एकत्रित केले अचानक त्यांचा श्वास बंद झाला. त्यांची प्रेरणाच आम्हला आमच्या कार्याला चैतन्य देत राहील. दिघे यांची जागा भरून निघणार नाही.

– मा. श्री. साबीर शेख

स्वातंत्र्यपूर्व कळत अनेक स्वातंत्र्य सेनानी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढले. तशाच प्रकारे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता जनतेची कामे करणारा स्वातंत्र्यनंतरचा हा एकमेव नेता तसेच सावतंत्र्यानंतरचा स्वातंत्र्य सेनानी हरपला.

– मा. ऍड. प्रभाकर हेगडे

उत्कृष्ट कार्य करणारा जिल्हाप्रमुख व जवळचा मित्र गेला. त्यांच्या निधनाने शिवसेनेत कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंगी असलेले गुण व त्यांच्या कार्याचा आदर्श कार्यकर्त्यांनी डोळ्यापुढे ठेवणे गरजेचे आहे.

– मा. श्री. अनंत तरे

आम्ही आज अक्षरशः पोरके झोलो. खऱ्या अर्थाने माणुसकी जपत असंख्य माणसे जोडणारा हा ठाण्यालाच नव्हे तर अभ्यं महाराष्ट्राला भूषणावह वाटणारा आमचा लाडका नेता आमच्यात आज नाही, याची अतिव दुःख आम्हाला पचवणे अशक्य आहे.

– मा. श्री. प्रकाश परांजपे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पताका गेली ३ वर्ष स्वाभीमानाने खांद्यावर घेऊन समाजातील शेवटच्या घटकांना न्याय मिळवून देणारा नेता हरपला. दिघे यांनी केलेला श्रीमलंग गडावरील धर्मश्रद्धेचा न्याय लढा व सातारचे गोडोली तळे बचाव आंदोलन जनता कधीच विसरणार नाही.

– मा. श्री. उदयनराजे भोसले

राजकारणात कधीही न आढळणारे असे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. सत्तेची कास न धरता सामान्यांसाठी दिघे हे आयुष्यभर चंदनासारखे झिजले. त्यांच्या निधनाने शिवसेनेत कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

– मा. श्री. नामदेव ढसाळ

संघर्ष हाच जीवनाचा पाय असणारा, सर्वसामान्यांसाठी कुणाचीही पर्वा न करता सतत संघर्ष करणारा नेता हरपला. अव्व्ल रत्नपारख्याप्रमाणे कार्यकत्यांची योग्यता लक्षात त्यांना योग्य ठिकाणी बसवून त्यांच्याकडून योजलेले कार्य पूर्ण करून घेणारा रत्न पारखी आम्ही गमावला आहे.

– मा. श्री. जगन्नाथ पाटील

आनंद दिघे शिवसेनाप्रमुखांच्या गळयातील ताईत होते. जिल्ह्याचा परिवार हाच त्यांचा संसार होता. संघटनेवर नितांत प्रेम करणारे, शहराचा कुठलाही उत्सव वेगळेपणाने साजरा करणारे, कार्यकर्त्यांना बळ देणारे, वृद्धांना आधार देणारे सर्वांना आधार देणार म्हणजे आनंद दिघे.

– मा. श्री. हरेश्वर पाटील

शिवसैनिकांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे, आधार वाटणारे, कुठल्याही कार्यक्रमाची जबादारी स्वीकारून ती उत्तम प्रकारे पार पाडणारे असे आदर्श म्हणजे आनंद दिघे होते. आपल्या जीवनातही प्रत्येक क्षण अन क्षण त्यांनी शिवसैनिकांना दिले.

– मा. श्री. सुधीर भाऊ जोशी

सामाजिक कार्यकर्ता व सर्व सामन्याचे हित जपणारा माणूस निघून गेल्याने ठाणे शहराचा सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात महाराष्ट्र प्रदेश आर . पी . आय . सहभागी आहे.

– मा. श्री. गंगाराम इंदिसे

गेली २ वर्ष चालू असलेला ठाण्यातील एक अध्याय संपला. ९७ साली शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही एकत्रित काम करण्यास सुरवात केली. या माणसाने स्वतःच्या कर्तृत्वाने शिवसेनाप्रमुखांनी टाकलेले विश्वास सार्थ केला. समाजातील सर्व स्तरावर त्यांनी काम केले. हा माणूस उत्कृष्ट आयोजक झाला होता. नियोजचा उत्कृष्ट आदर्श म्हणून त्याच्याकडे बोट दाखवता येईल. स्वतः निवडणूक लढवायची नाही हा त्यांचा आग्रह. या विषयावर त्यांचे व माझे वाद झाले, परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम होते. परंतु इतरांच्या निवडूणुकीसाठी झोकून दिल्यासारखे काम त्यानेच करावे. ठाणे जिल्ह्यातील गाव गावात शिवसेना पोहोचवणे हा सर्वांचा ध्यास. परंतु प्रत्यक्ष गाव गावात, खेडोपाडी शिवसेना पोहोचवली ती आनंदनेच.

– मा. श्री. सतीश प्रधान